परंडा / प्रतिनिधी : - 

 परंडा येथील मुद व जलसंधारण कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील लोहारा येथील पाझर तलाव दुरुस्तीच्या बोगस कामाची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने अंदोलन करण्यात येईल असा इशारा अंकुश डांगे यांनी निवेदना द्वारे दिला आहे .

 तहसिलदार परंडा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना  दि.१६ जुन रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलेआहे की परंडा तालूक्यातील लोहारा ग्रामपंचायत हद्दीतील पाझर तलाव दुरुस्तीचे काम ठेकेदार मार्फत करण्यात येत असुन आधिकारी व ठेकेदार यांचे संगण मत असल्याने भरावावर माती मिश्रीत मुरूम वापरण्यात येत असुन रोलर मार्फत दबाई करण्यात येत नाही तसेच पिचींग साठी लहान दगडाचा वापर करून निकृष्ठ दर्जाचे काम करण्यात येत आहे .

या कामाचे अंदाजपत्रक अभियंता यांच्या कडे मागणी केली असता टाळाटाळ करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून सबंधीतावर कारवाई करावी अन्यथा ग्रामस्था कडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.निवेदनाच्या प्रति तहसिलदार परंडा ,मुद व जलसंधारण उप विभाग परंडा यांना देण्यात आल्या आहेत.

 
Top