तुळजापूर / प्रतिनिधी-

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत  शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन छञपती शिवाजी महाराज अश्वरुढ पुतळ्यासाठीचे भूमिपुजन सोहळा मंहतांच्या उपस्थितीत आ. राणाजगजितसिंहपाटील यांच्या हस्ते रविवार दि. ६ रोजी संपन्न झाला.

  प्रारंभी छञपती शिवाजी महाराज पुतळ्यास आ. राणजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला नंतर पुष्पहार घालुन अभिवादन केल्यानंतर श्री तुळजाभवानीचे मंहत तुकोजीबुवा, महंत माऊजीनाथ महाराज,मंहत  इच्छागिरी महाराज, मंहत  व्यंकटअरण्य महाराज,नगराध्यक्ष सचिन रोचकरी आदींच्या उपस्थित भूमीपुजन करण्यात आले.

यावेळी युवा नेते विनोद गंगणे, नगरसेवक अमर मगरख, रणजित इंगळे ,सुनिल रोचकरी, नागेश नाईक, माऊली भोसले ,विजय कंदले, तानाजी कदम ,  गोकुळ शिंदे , विशाल रोचकरी, अभिजीत कदम, सुधीर कदम, अर्जुन  साळुंके, संदिप गंगणे,सागर इंगळे ,नितीन रोचकरी,नितीन जट्टे, कुमार तात्या टोले,आण्णासाहेब क्षीरसागर,दिनेश कापसे,बापु नाईकवाडीसह सर्वपक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी शिवप्रेमी संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

 
Top