तेर / प्रतिनिधी- 

 राज्यातील भटक्या-विमुक्त लोकांसाठी, गोर-गरीब नागरिकांसाठी जे लोक भटकंती करून उपजीविका साधतात अशा लोकांना स्वतःचे हक्काचे घर असणे हा त्यांचा अधिकार आहे. यासाठी राज्य सरकारने यशवंतराव मुक्त वसाहत अंतर्गत घरकुल भटक्या विमुक्तांसाठी दिले जाते. त्या घरकुलच्या निधीची मर्यादा एक लाख 33 हजार वरून दोन लाख रुपये करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

  शहरांमध्ये घरकुल देत असताना दोन लाख रुपये देतो आणि त्याच घरकुलासाठी ग्रामीण भागासाठी आपण एक लाख 33 हजार रुपये एवढा तोकडा निधी आपण देतो; परंतु आजच्या काळामध्ये विटा, सिमेंट ,वाळू ,फरशी याचे भाव गगनाला भिडलेले आहेत .अशा परिस्थितीमध्ये गोर गरीब माणसाने घर बांधणे ही किती मोठी गोष्ट ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण किंवा शहरी असा भेदभाव न करता सरसकट भटक्या विमुक्तांसाठी दोन लाख रुपयांची घरकुल योजना करावी अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे  केली आहे.

 
Top