उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, माजी आमदार बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद शहर काँग्रेसच्या वतीने कोरोना काळात नागरिकांची जेवणाची व्यवस्था व्हावी, या हेतूने उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयाजवळ, काँग्रेस भवन समोर दि.13 मे पासून “मोफत भोजन सेवा” सुरू करण्यात आली होती. एक महिन्यानंतर आज दि.13 जून रोजी या उपक्रमाची सांगता करण्यात आली.

32 दिवस चाललेल्या या उपक्रमांतर्गत दररोज सायं. 7 ते 9 या वेळेत रुग्णांचे नातेवाईक व इतर गरजू नागरिकांना पोटभर जेवण व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. यादरम्यान दररोज सरासरी  350 नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला. जिल्हा शासकीय रुग्णालयात उस्मानाबाद जिल्हा व परिसरातून रुग्ण उपचार घेत होते, यात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक होती. त्यांची जेवण व पिण्याच्या पाण्याची चांगली सोय झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमास जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील, नगर परिषद मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेटी देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. लोकांच्या अडचणीच्या काळात कुठलाही गाजावाजा न करता बसवराज पाटील व सहकाऱ्यांनी केलेल्या सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिष मोदाणी, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, महिला काँग्रेसच्या डॉ.स्मिता शहापुरकर, माजी नगरसेवक सय्यद नादेरउल्ला हुसैनी, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील सर, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, राज कुलकर्णी, धनंजय राऊत, युवक काँग्रेसचे उमेश राजेनिंबाळकर, अभिषेक बागल, सुरेंद्र दादा पाटील, अतुल देशमुख, अब्दुल लतीफ, संजय गजधने, सचिन धाकतोडे, प्रेम सपकाळ, सुधीर अलकुंटे यांच्यासह सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 
Top