उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

देशातील वाढती बेरोजगारी, पेट्रोल-डिझेलची दरवाढ, घरगुती गॅस व खाद्य तेलाची महागाई, शेतकरी आणि कामगारविरोधी कायद्याविरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी शेतकरी व कामगारविरोधी कायद्यांचे प्रतिकात्मक दहन करुन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील, संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. स्मिता शहापुरकर, सरचिटणीस जावेद काझी, माजी नगरसेवक सय्यद खलील, युवक प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, शहाजी मुंडे, किसान सेलचे निरीक्षक विश्वजित शिंदे, जिल्हाध्यक्ष गौरीशंकर मुळे, राज कुलकर्णी, प्रणित डिकले, आयुब पठाण, सुरेंद्र पाटील, अलीम शेख, सलमान शेख, संजय गजधने, रेहमुन्नीसा शेख, कफिल सय्यद, राहुल लोखंडे, इम्रान हुसैनी, महेश पाटील, नियामत मोमीन, अभिजित देडे, जमील सय्यद, आरिफ मुल्ला, कृष्णा तवले, प्रसन्न कथले, समाधान घाटशिळे, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेसच्या वतीने गरीबांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत कायदेविषयक मदत व सल्ला केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. 

 
Top