उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचाचे कार्याध्यक्ष हुसेन बारसकर  व राज्यकोषाध्यक्ष पवन सुर्यवंशी  यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दि.१८ जून २०२१ रोजी राज्य उपाध्यक्ष नंदकुमार दंडीले ,सोलापूर जिल्हाध्यक्ष इकबाल नदाफ  ,सातारा जिल्हाध्यक्ष विकास खांडेकर आदींचे शिष्टमंडळ  ग्रामविकास विभाग बांधकाम भवन,मुंबई या ठिकाणी दि.७ एप्रिल २०२१ च्या नवीन बदली धोरणाबद्दल चर्चा करण्यासाठी सकाळी ठिक ९:४५ वा.ग्रामविकास विभाग मुंबई येथे पोहोचले.

 नियोजित वेळेनुसार सकाळी ११ वा.ग्रामविकासचे अप्पर मूख्य सचिव राजेशकुमार यांची भेट घेवून एकल शिक्षकावर बदलीत होणारा अन्याय दूर करण्यासाठी निवेदन देवून त्यातील प्रत्येक मुद्याची सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी त्यांनी  योग्य न्याय देण्याचे अभिवचन दिले. या शिष्टमंडळास दिले. 

त्यानंतर  दुपारी  १ वा. विजय चांदेकर  यांची भेट घेवून दि.७ एप्रिल २०२१ च्या बदली धोरणावर जवळपास दीड तास मुद्देनिहाय सविस्तर चर्चा करण्यात आली व एकल शिक्षकावर कसा अन्याय होतो हे टीम मधील सदस्यांनी उदाहरणासह पटवून दिले. त्यानंतर  विजय चांदेकर यांनी एकल शिक्षकावरील अन्याय दूर करण्याचे आश्वासन दिले.

  या सर्व कामी ग्रामविकासचे कक्ष अधिकारी  नवनाथ पोकळे  यांनी बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन केले असल्यामुळे राज्य एकल शिक्षक सेवा मंचच्या वतीने त्यांचे आभार यावेळी मानण्यात आले. 

 
Top