विशेष पोलिस महानिरीक्षक प्रसन्ना यांच्या हस्ते सन्मान

उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. प्रसन्ना यांच्या हस्ते जिल्हा पोलिस दलातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्रीडांगणाचा शुभारंभ करण्यात आला.

विशेष पोलिस महानिरीक्षक प्रसन्ना यांनी शनिवारी पोलिस मुख्यालयास भेट दिली. पोलिस जवान व कुटुंबीयांसाठी पोलिस मुख्यालयात बास्केटबॉल, टेनिस या दोन्ही खेळांचे एकत्रित असे कृत्रिम मैदान (कोर्ट) बांधण्यात आले असून त्याचे उद्घाटन या प्रसंगी करण्यात आले.

जिल्हा पोलिस दलातील इंदू समिंद्रे, बाबासाहेब कांबळे, अमोल बनसोडे, बिभीषण कुंभार, जाकीर काझी, शिवाजी गवळी, शौकत पठान, सतीश घोळवे, शोभा बांगर, मुकुंदराज गिरी, विठ्ठल चौधरी, शिवलींग घोळसगाव, संतोष पवार, दाजीबा गव्हाळे, प्रदीप जगताप, जुबेर काझी, गजेंद्र गुंजकर, ज्योती गीरी, अविनाश जाधव, अमोल चव्हाण, संजय पानसे, संजय पाटील, आरती ढवारे, राहुल घुटे, अभिजित कंदले, सविता रासने यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी गुन्हे तपास, बेपत्ता शोध, फरारी आरोपी अटक, तांत्रीक विश्लेषण करणे अशा स्वरुपाचे उल्लेखनीय कार्य केले होते. याप्रसंगी पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन, अपर पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांच्यासह जिल्हा पोलिस दलातील अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.

 नाव उंचवावे

पोलिस कॉन्स्टेबल ते सहायक पोलिस उपनिरीक्षक यांची पोलिस दलात ९३ टक्के संख्या अाहे. तुम्ही पोलिस दलाचा कणा आहात. जनमाणसात पोलिसांची प्रतिमा निर्माण करण्यात तुमचा मोलाचा सहभाग आहे. तुम्ही असेच प्रभावी कार्य करुन पोलिस दलाचे नाव उंचवावे.’’ के. एम. प्रसन्ना, विशेष पोलिस महानिरीक्षक 

 
Top