तुळजापूर / प्रतिनिधी

तालुक्यातील मुर्टा - मानमोडी ग्रामपंचायत क्षेत्राच्या हद्दीतील पाचपीरच्या उजाड डोंगरावर राज्य शासनाचा वनीकरण विभाग, उस्मानाबाद जिल्हा परिषद आणि मुर्टा - मानमोडी ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने तब्बल पन्नास हजार वृक्षरोपे लावण्याचा शुभारंभ दिनांक 22 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गत 5 जून या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षसंवर्धनासाठी “ रोपे लावा, जोपासना करा व वृक्षामध्ये रुपांतर करा “ या संकल्पनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या दिशानिर्देशानुसार सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग, महसूल प्रशासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत आदी विभागांच्या सहभागातून उजाड माळरानावर, पडीक जमिनीवर, शेतबांधावर इतकेच काय गाव पातळीवरील घराच्या परस बागेत जेथे शक्य आहे तेथे प्रत्येक मानसी किमान तीन झाडाची रोपे म्हणजेच शासन निर्देशानुसार लोकसंख्येच्या तीनपट यानुसार विविध जातीची रोपे लावून त्यांचे जतन करण्याचे सूचनावजा आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार त्याचाच एक भाग म्हणून तुळजापूर तालुक्यातील जळकोट पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मुर्टा - मानमोडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाचपीर या डोंगरावर अंदाजे तीनशे ते चारशे एकर क्षेत्रावर तब्बल पन्नास हजार विविध जातीच्या रोपांची लागवड करण्याचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अस्मिता कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा) कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दाताळ,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, तुळजापूर पंचायत समितीच्या सभापती सौ. रेणुका इंगोले, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड,  विस्तार अधिकारी के. बी. भांगे, विस्तार अधिकारी राऊत, गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, ग्रामसेवक प्रदीप शिंदे,  जळकोटचे ग्रामविकास अधिकारी जी. के. पारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विक्रम पाचंगे आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top