तुळजापूर / प्रतिनिधी

  छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे राज्यभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्त श्री तुळजाभवानी मंदीरातील कुंडातील पविञ जल, कुंकू, कवड्याची माळ पुजन करुन रायगडाकडे रवाना झाले आहेत.

 शिवबाराजे प्रतिष्ठाणच्या वतीने मागिल १० वर्षापासुन महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या पुण्य पावण नगरीतुन श्री कल्लोळ तिर्थ, श्री गोमुख तिर्थातील पवित्र   कुंडातील पविञ जल, देविच्या कवड्याची माळ, हळद -कुंकू घेऊन जातात .तसेच प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी श्री किल्ले रायगडावर होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्यासाठी तुळजापुर येथुन तुळजाभवानी देविच्या पवित्र कुंडातुन जल,कवड्याची माळ हळदी कुंकू घेऊन रायगडाकडे प्रस्थाण करण्यात आले. यावेळी  प्रथमता सकाळी श्री तुळजाभवानी मंदीर महाध्दार समोर पवित्र जल कुंभाचे पुजन करण्यात आले .नंतर दुचाकीवरुन रायगडाकडे मावळे रवाना झाले आहेत.

यात  अर्जुन आप्पा साळुंके,रोहीत नागनाथ चव्हाण, विकास वाघमारे,नितीन जट्टे,विकास शेटे,कृष्णा जितकर,स्वराज तेलंग, ,ओंकार पवार, अंबादास देशमुख, प्रतिक अंबुरे ,साई वाकुडे, गणेश घुगे,विशाल मगर,अकाश नाईकवाडी,आशुतोष माने आदी शिवभक्त उपस्थित होते.

 

 
Top