परंडा / प्रतिनिधी

  येथील पोलिस पथकाने संशयास्पदरित्या फिरत असलेल्या चोरट्याला सोमवार २१ रोजी अटक करून त्याच्याकडून तीन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या.

 परंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गिड्डे, पीएसआय दादासाहेब बनसोडे, सहाय्यक पोलिस फौजदार केरबा कांबळे, हवालदार दिलीप पवार, अजित कवडे, सुशिलकुमार कोळेकर, प्रकाश माने, नंदा वडदरे सोमवारी (दि. २१) गस्त घालत असताना रमेश डिकोळे हा संशयास्पदरित्या आढळला. त्याला त्याब्यात घेवून चौकशी केली. सुरेश भोपाल तिरीथे (रा. कुरुल ता. मोहोळ), अनिल विटकर (रा. शास्त्रीनगर सोलापूर) व पुणे येथील शुक्रवार पेठ येथील तेजेस रमेश जाधव यांच्या चोरीला गेलेल्या दुचाकी त्याच्याकडून जप्त केल्या.


 
Top