उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील विविध मागण्यांबतचे निवेदन दि. ४ जून रोजी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण विकास मंत्री  सुनील केदार हे तुळजापूर येथे आल्यावर महाराष्ट्र राज्य खो -खो संघटनेचे सहसचिव चंद्रजीत जाधव,पंचायत समिती सदस्य गजेंद्र राजेंद्र जाधव,प्रवीण बागल यांनी दिले.

या निवेदनामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय असलेल्या खेळांपैकी खो खो,कबडडी,ऍथलेटिक्स,धनुर्विद्या,व्हॉलीबॉल,फुटबॉल या खेळामध्ये अनेक खेळाडूंनी आजपर्यंत राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करून राज्यांच्या लौकिकात भर टाकली आहे.सध्या उस्मानाबाद जिल्हा क्रीडा कार्यालयासाठी एकही NIS राज्य क्रीडा मार्गदर्शक नाही तरी जिल्हा क्रीडा कार्यालयासाठी NIS राज्य क्रीडा मार्गदर्शक उपलब्ध करून देण्यात यावे,

श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे अद्ययावत असा जलतरण तलाव असून तो मागील काही वर्षांपासून दुरुस्ती अभावी बंद असून या जलतरण तलावाच्या दुरुस्तीसाठी क्रीडा खात्याच्या वतीने विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात यावा,श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल येथील BOT तत्वावर बांधण्यात आलेले क्रीडा वस्तीगृह आजपर्यंत विकासकाने जिल्हा क्रीडा संकुल समितीकडे हस्तांतरीत केलेले नाही त्यामुळे उस्मानाबाद येथे स्पर्धा आयोजित करण्यासाठी अनेक निर्माण होत आहेत तरी याबाबत आपण जातीने लक्ष घालून वसतीगृहाचा विषय निकाली काढावा,केंद्र सरकारच्या वतीने नुकतेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध खेळाची खेलो इंडियाची  केंद्रे मंजूर केलेली आहेत मात्र ही मंजूर केलेली केंद्र ही महाराष्ट्रासाठी खूप कमी आहेत तरी आपण राज्यामध्ये खेलो इंडियाची किमान १०० केंद्रे सुरु होण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा,शिवछत्रपती व अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंना राज्य सरकारच्या वतीनं थेट नोकर भरतीद्वारेनोकरी देण्यात यावी,सध्या राज्य सरकारच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनासाठी दोन लक्ष निधी दिला जातो सध्याचा स्पर्धा आयोजनाचा खर्च पाहता अतिशय तुटपुंजी रक्कम आहे तरी राज्य पातळीवरील स्पर्धा आयोजनासाठी १० लक्ष तर राष्ट्रीय स्पर्धा आयोजनासाठी २० लक्ष रुपये निधीची तरदूत करण्यात यावी,राज्य क्रीडा परिषदेचे नव्याने पुनर्गठन करण्यात यावे या अनेक मागण्यांचे निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली.

शासनदारबारी पाठपुरावा करणार

श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल येथील BOT तत्वावर बांधण्यात आलेले क्रीडा वस्तीगृह हस्तांतरीत करण्यासाठी क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी क्रीडा आयुक्त बकोरिया यांच्यासोबत फोनवर सकारात्मक चर्चा केली असून विकासकाकडून हस्तांतरीत होईपर्यंत शासनदरबारी पाठपुरावा करणार

                                          चंद्रजीत जाधव - महाराष्ट्र राज्य खो -खो संघटनेचे सहसचिव

क्रीडा सुविधा उपलब्ध करा 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्पर्धेत नैपुण्य प्राप्त खेळाडू असल्याने अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यामध्ये सिंथेटिक टफसारखे मैदाने तसेच खेळाडूसाठी अत्याधुनिक साहित्य जिल्हा क्रीडा कार्यालया मार्फत उपलब्ध करून द्यावे.

                                          गजेंद्र जाधव - पंचायत समिती सदस्य उस्मानाबाद

 
Top