परंडा / प्रतिनिधी 

परंडा येथील भाजपा कार्यालयात भाजपा ओबीसी मोर्चाची ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण मा.सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विजय शिंगाडे यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

शिंगाडे यांनी ओबीसी आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी पुढील दिशा ठरविण्याबाबत सर्व पदाधीका-यांना आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन केले. तसेच यासाठी अंदोलन, रास्ता रोको व इतर मार्गाने ओबीसी आरक्षण पुन्हा स्थापीत करण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रास्तावीक ॲड. तानाजी वाघमारे यांनी केले. 

या कार्यक्रमाला भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस ॲड.जहीर चौधरी, भाजपा तालुका सरचिटणिस विठ्ठल तिपाले, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲड.तानाजी वाघमारे, तालुका उपाध्यक्ष शिवाजी पाटील, युवा ता.सरचिटणीस अरविंद रगडे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा चिटणीस साहेबराव पाडुळे, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष तुकाराम हजारे, भाजपा युवा नेते उमाकांतजी गोरे, सागर पाटील, कोळी, शिवानंद तळेकर व हिमालय वाघमारे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन विठ्ठल तिपाले तालुका सरचिटणीस यांनी केले.


 
Top