लोहारा/प्रतिनिधी

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालयात लोहारा शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कोविड १९ च्या काळात पत्रकारांनी नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर आणून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करुन विविध उपाययोजना बद्दल जनजागृती करण्याचे काम केले आहे. 

त्यामुळे कोविड योद्धा म्हणून यावेळी शहरातील पत्रकार नीलकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, इकबाल मुल्ला, अशोक दुबे, गणेश खबोले, जे.के.बायस, अब्बास शेख, यशवंत भुसारे, सचिन ठेले, यांचा सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हाजी बाबा शेख, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, नवाज सय्यद, राजेंद्र कदम, मिलिंद नागवंशी, प्रकाश भगत, विद्यार्थी संघटनेचे पृथ्वीराज जगताप, सामजिक न्याय विभागाचे संजय गायकवाड, स्वप्निल माटे, आदी उपस्थित होते.

 
Top