तुळजापूर / प्रतिनिधी-

 नगर परिषद   व उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर शहरातील लोकांची कोविशिल्ड लसीची लसीकरणाची भीती कमी करण्यासाठी तुळजापूर शहरात नगर परिषद ,तुळजापूर यांच्या पुढाकाराने एकूण 6 लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.यातील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 येथे  पहिल्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्ष  सचिन (भैय्या) रोचकरी  यांच्या शुभहस्ते तयार करण्यात आले

या प्रसंगी जिल्हा  मजूर फेडरेशन चे माजी चेअरमन तथा माजी नगरसेवक नारायण नन्नवरे ,सौ.मंजुषाताई देशमाने (महिला बालकल्याण, उपसभापती), श्री.किशोर (भाऊ) साठे (शिक्षण सभापती,नगर परिषद तुळजापूर) त्याप्रसंगी नगरसेवक श्री.पंडितराव जगदाळे ,श्री.विजय (आबा)कंदले, मजूर फे नारायण (भाऊ) नन्नवरे,श्री.राजाभाऊ देशमाने,श्री.वैभव पाठक (नगर परिषद  तुळजापूर ,कार्यालयीन अधीक्षक )यांची उपस्थिती होती.

 भयमुक्त आणि आनंददायी वातावरणात लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी येण्याऱ्या नागरिकांचे आकर्षक रांगोळ्या काढून,पायघड्या घालून, सुमधुर संगीतासह, कुंकुम तिलक लावून गुलाब पुष्प देऊन तसेच लसीकरण झाल्यानंतर चहा देऊन कोविशिल्ड लस देण्यात आली. या प्रसंगी *उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांना केंद्र शासनाचे राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाल्याबद्दल  नगराध्यक्ष सचिन  रोचकरी यांच्या हस्ते तुळजाई क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तुळजापूर (खुर्द )यांच्या वतीने सन्मान कर्तुत्वाचा हे सन्मानचिन्ह शाल, श्रीफळ देऊन वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीधर जाधव,डॉ.कमठाणे डी. बी.,आरोग्य पर्यवेक्षक श्री.पांडागळे एन. के.,स्टाफ नर्स श्रीमती मस्तुद सी.एम.,श्रीमती चव्हाण पी.वाय., श्रीमती काकडे एल.सी., श्रीमती कोकणे यु.के., श्रीमती अडसुळे ई,ए.,एक्स रे टेक्निशियन श्री.चौधरी आय.जी., डाटा एंट्री ऑपरेटर श्री.हिरेपट जयप्रकाश,कक्ष सेवक श्री.सागावे पी.बी.तसेच उपजिल्हा रुग्णालय,तुळजापूर रुग्ण सेवा समितीचे सदस्य श्री.आनंद(दादा)कंदले या सर्वांचा सत्कार करण्यात आला नगर परिषद तुळजापूर ने तयार केलेल्या या स्मार्ट लसीकरण केंद्रामध्ये आलेल्या प्रत्येक नागरिक आनंदी आणि उत्साही वातावरणात लसीकरण केंद्रात येऊन लस घेऊन जात असताना निदर्शनास आले उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिले स्मार्ट आणि अतिशय सुंदर तयार करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रास तुळजापूर शहरातील नागरिक , उपजिल्हा रुग्णालय तुळजापूरच्या वैद्यकीय अधीक्षक श्रीमती चंचला बोडके आणि मा.मुख्याधिकारी श्री.आशिष लोकरे(नगर परिषद, तुळजापूर) यांनी भेट दिली.

 लसीकरण केंद्रावर 100% लसीकरण होण्यासाठी नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3  तुळजापूर (खुर्द)शाळेचे मुख्याध्यापक श्री.मोटे टी.डी.,सहशिक्षक श्री. शेंडगे ए.बी.,श्री.साळुंके बी.एस.,श्री. राऊत जे. एन. ,श्रीमती कुलकर्णी एन.व्ही., श्रीमती  गायकवाड एन.बी.,श्रीम. सय्यद वाय.एम., श्रीमती व्हटकर के.पी.,श्री.देडे एस.बी , श्रीम.अमृतराव ए.बी.,श्री. प्रफुल्ल खंडागळे, श्री. प्रमोद भोजने, श्रीम.लोहारे के.ए.,श्री.अमर ताकमोगे, श्री.संजय इंगळे,श्री.वेदप्रकाश औटी,श्रीम.माने शालन तसेच तुळजाई नागरी सहकारी पतसंस्था तुळजापूर खुर्द चे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


 
Top