उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोना रूग्णांच्या संदर्भात रूग्णालयाचे बिले मोठ्या प्रमाणात येत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व खासगी रूग्णालयात लेखा परिक्षकांची नियुक्ती करणे सक्तीचे केले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

शुक्रवार दि. १८ जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते. दुपारी ३ वाजता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या तीसऱ्या लाटे संदर्भात व खरिपाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आधिक माहिती देताना, अजित पवार यांनी जिल्हयात औषध पुरवठा पुरेसा आहे का ? पुर्वीच्या प्रमाणात अॅब्युलन्स आहेत का ?  बेड उपलब्ध आहेत का ? लहान मुलांना लागणारे वेगळे वेटीलेंटर आहेत का ? याबाबत माहिती घेतल्याचे सांगून ब्लॉक फंगर्सवरील औषधांचा तुटवडा पुर्ण राज्यात आहे. जिल्हयात पुरेशा प्रमाणात औषधांचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल. आजच्या बैठकीत खरीफ व कोरोना बाबत जे कांही महत्वाचे निर्णय आहेत. येथेच उस्मानाबादेतच घेतले आहे तर कांही निर्णय मंत्रीमंडळासमोर ठेवून घ्यावे लागतील असे सांगितले. 

आमदारांना अजून एक कोटी खर्च करण्यास परवानगी

कोरोनावर उपाय-योजना करण्यासाठी वीज-पाणी-रस्ता या संदर्भात कांही समस्याय असतील तर त्वरीत त्या जिल्हाधिकाऱ्यांना सोडविण्याचे सांगितले असून आमदारांना कोरोना उपाययोजनासाठी ४ कोटी पैकी एक कोटी खर्च करण्यास परवानगी दिली होती. परंतू कांही आमदारांनी अजून एक कोटी खर्च करण्याची परवानगी मागितल्याचे सांगून कोरोना उपाययोजनासाठी २ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आल्याचे संागितले. उस्मानाबादेतील मेडीकल कॉलेज संदर्भात बोलताना जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो प्रश्न लवकर सुटून जागा लवकर हस्तांतरण करण्यात येईल, असे सांगितले. 

१५ जूलै पर्यंत सर्व बँकांनी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे

राष्ट्रीतकृत बँकांसह सर्व बँकांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घ्यावी, जिल्हयात शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त पीक कर्ज मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन प्रयत्न करावेत, असे आदेश आपण दिल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार यंानी उस्मानाबाद जिल्हयासाठी १५४० कोटी रुपयांचे उद्दीष्ट ठेवले असल्याचे सांगितले. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेला मदत करण्यासंदर्भात बोलताना जिल्हयातील सहकार क्षेत्रातील सर्व संस्था व्यवस्थित चालविणे आवश्यक होते. परंतू जून्या लोकांनी चांगल्या पध्दतीने न चालविल्यामुळे सहकार क्षेत्र मोडकळीस आले. राज्य सरकार बँकांना व सहकार क्षेत्रातील संस्थांना किती मदत करणार यावर पत्रकारांनी आपण नांदेड बँकेला १०० कोटीची मदत केली होती. ते नजरेत आणून देताच अजित पवार यांनी त्यावेळेस आशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यामुळे नांदेड जिल्हा बँकेला मदत करून देखील बँकेची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही, असे सांगून सरकार ने सहकार क्षेत्रातील कांही संस्थांची हमी घेतली आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर ती थक हमी उस्मानाबाद जिल्हा बँकेला देऊन मदत करू, असे सांगितले. यावेळी खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार विकास कांळे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर, पोलिस अधिक्षक राजतिलक रौशन, जिल्हा परिषदचे सीईओ विजयकुमार फड , उस्मानाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश बीराजदार उपस्थित होते. 

चौक बंदोबस्त 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा बीड येथे मराठा आरक्षणावरून आडविण्याचा प्रयत्न झाल्यानंतर उस्मानाबादेत पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला होता. पवार बैठकीनंतर सोलापुरवरून विमानाने जाणार होते. त्यामुळे उस्मानाबाद ते सोलापूर या रस्त्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

 
Top