उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्यदिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहा जून रोजी राज्याभिषेक झाला. त्यानिमित्ताने राज्य शासनाने 6 जून रोजी शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

 जिल्हा परिषदेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास  महिला आणि बालकल्याण सभापती श्रीमती रत्नमाला पंडितराव टेकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय तुबाकले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, कार्यकारी अभियंता नितीन भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एन.पी.आघाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही. वडगावे आदी उपस्थित होते.

 
Top