तुळजापूर / प्रतिनिधी

 महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास तीनशे कोटीची रक्कम प्रदान करण्यासाठी मान्यता दिल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा पगारीचा मार्ग सुकर झाला आहे.तीनशे कोटी रुपये प्रदान करण्याचे परिपञक शासनाने मंगळवार दि.२२रोजी काढले आहे.

 महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने महाराष्ट्र राज्यपरिवहन महामंडळास कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन व वेतन संबंधी बाबी यासाठी दोन मासिक हप्त्यामध्ये सहाशे कोटी रुपये मंजुर केले होते. त्यापैकी ३०० कोटी रुपये सन 2021-22 या अर्थिक वर्षाच्या तरतूदी  मधुन मान्यता देण्यात आली आहे.

 कोरोनामुळे महाराष्ट्र राज्यपरिवहन महामंडळची अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांशी वाहतूक सेवा बंद होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्यपरिवहन महामंडळच्या कर्मचाऱ्यांचे मे 2021 चे वेतन थकले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ९/६/२०२१ रोजी बैठक होवुन त्यात महाराष्ट्र राज्यपरिवहन महामंडळ ६०० कोटी रुपये वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती, हीरक्कम दोन मासीक हप्तात देण्यास मंजुरी दिली आहे.


 
Top