तेर / प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथे खरीप हंगामाच्या पूर्वतयारी निमित्ताने कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना बी बी एफ (रुंद वरंबा सरी) पद्धती नुसार पेरणी बाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील कार्यक्रम समन्वयक सचिन सूर्यवंशी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बी बी एफ पेरणी पद्धत तसेच बीबीएफ यंत्राची जोडणी व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी डी .आर .जाधव यांनी बीबीएफ यंत्राद्वारे पेरणीचे महत्व सांगितले. यावेळी लासोना येथील स्वामी ऍग्रो इंडस्ट्रीजचे मालक गुरुलिंग स्वामी, ओमकार स्वामी यांनी यापूर्वीच्या बीबीएफ यंत्राच्या वापरामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीवर मात करून सुधारित बी बी एफ पेरणीयंत्र बनविले आहे. याचे प्रात्यक्षिक याठिकाणी दाखविण्यात आले. या कार्यक्रमासाठी मंडल कृषी अधिकारी सत्यजित देशमुख, कृषी सहाय्यक वैभव लेनेकर, कुमोद मगर, सत्यजित निकम, प्रगतशील शेतकरी रेवणसिद्ध लामतुरे, नागेश हाजगुडे, काका पाटील, पांडुरंग वाकुरे यांच्यासह शेतकरी व ट्रॅक्टर चालक उपस्थित होते.


 
Top