तेर/ प्रतिनिधी 

तालुक्यातील तेर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दि. 24 जूनला भेट देऊन भोजन केले.  यावेळी सक्षणा सलगर यांच्या पाठीशी खंबीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  आहे, हा संदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक प्रकारे दिला आहे.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर , आ. विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार आदी उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

 
Top