तुळजापूर/ प्रतिनिधी

 समाजातील दुर्बल आणि आदिवासी भागातील कौशल्यभिमुख शिक्षण देणाऱ्या व्यवसायिक शिक्षकाकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे या शिक्षकांनी दि. 28 पासून बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. 

गेली आठ दिवसापासून व्यवसायिक शिक्षकांनी गुण मूल्यांकनाच्या कामावर बहिष्कार घातलेला आहे, तरी देखील शासनाने याची कोणतीच दखल घेतली नाही म्हणून व्यवसायिक शिक्षक महासंघाने दि. 28 पासून बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या शिक्षकांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने त्यांचे वेतन होत नाही त्यामुळे त्यांच्यावर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाद्वारे शिक्षक योजनेची अंमलबजावणी न करता राज्याबाहेरच्या खाजगी कंपनीस कंत्राट देऊन कमिशन कमीविण्याच्या उद्देशाने या कंपनीने व्यवसायिक शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण केले आहे. समग्र कार्यालय त्याचबरोबर योजनेचे मूल्यांकन करणारी संस्था म्हणून पायाभूत सुविधा देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अपहार होत आहे , तो रोखण्यात यावा या व इतर एकूण अकरा मागण्यासाठी या शिक्षक महासंघाने इयत्ता दहावी व बारावीच्या गुण मूल्यांकन कार्यावर व पुढील सर्व शैक्षणिक कामकाजावर राज्यातील सर्व व्यवसायिक शिक्षकाने बहिष्कार टाकला आहे. यात जिल्ह्यातील 15 शिक्षकांनी सहभाग नोंदविला आहे,अशी माहिती व्यवसायिक शिक्षक महासंघाचे तालुका पदाधिकारी यांनी दिली आहे.

 
Top