उस्मानाबाद/ प्रतिनिधी

परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती,नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी परदेश शिष्यवृत्तीच्या निवडीसाठी  दि.12 मे 2021 च्या जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात येत असल्याबाबतची जाहिरात व मुदतवाढ  प्रसिध्द करण्यात आलेली होती.

 त्यानुसार अर्ज सादर करण्याचा अंतिम दि.14 जून 2021 व तदनंतर दि.18 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आला होता.आता अर्ज करण्याचा अंतिम दि.30 जून 2021 पर्यंत सायंकाळी 5.45 असा असेल.उर्वरित जाहिरातीबाबतचा तपशील हा पूर्वी दिलेल्या जाहिरातीप्रमाणेच असेल.असे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरावत यांनी कळविले आहे.


 
Top