उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथील माजी सरपंच श्री शिवाजी महादेव मगर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी वाघोली येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून काम केले होते. तसेच वाघोली जिल्हा परिषद गटाचे ते  जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करत होते. उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं.त्यांच्या पश्चात दोन मुले , तीन मुली  , नातवंडे असा परिवार आहे.


 
Top