उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

नगर परिषद उस्मानाबाद व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद शहरांमध्ये प्रभाग निहाय लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरामध्ये 45 वर्षावरील नागरीक तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना 1 ला डोस व 2 डोसचे मोफत लसीकरण शिबीर चालु आहे. या मोफत लसीकरण शिबीराद्वारे आत्ता पर्यंत 535 नागरिकांनी  लसीकरणाचा  लाभ घेतला आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी केले आहे. 

या लसीकरणामध्ये दररोज एका प्रभागामध्ये  दोन ठिकाणी शिबीर घेतले जाते.  तसेच एका शिबीराच्या ठिकाणी एकुण 200 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आजच्या तारखेपर्यंत  न.प. शाळा क्रमांक 24, तेरणा कॉलेज उस्मानाबाद,न.प.शाळा क्रमांक 18,सरस्वती शाळा बँक कॉलनी,न.प. शाळा क्रमांक 11, भाई उद्धवराव पाटील शाळा,न.प. शाळा क्रमांक 22, श्रीपतराव भोसले हायस्कूल,न.प.शाळा क्रमांक 14, गणेश नगर, पोहणेर रोड ,भिम नगर, मैलाना आझाद शाळा , नूतन विद्यामंदिर शाळा, काकडे कॉम्प्लेक्स, अखलाख डॉक्टर दवाखाना  या ठिकाणी आजपर्यंत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

आता पुढील काळात आर्य चाणक्य विद्यालय, न.प. शाळा क्रमांक 6 आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर येथे लसीकरण शिबीर चालु असणार आहे. या मोफत लसीकरण शिबीराद्वारे आत्ता पर्यंत 535 नागरिकांनी  लसीकरणाचा  लाभ घेतला आहे. यापुढील काळात देखील उस्मानाबाद शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी आहे. 


 
Top