उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 प्रमिला नगर उस्मानाबाद सोलापूर औरंगाबाद बायपास रोड परिसरामध्ये - उस्मानाबाद  शहरामध्ये कौशल्या फाऊडेशन ,स्माईल फाँर आँल व स्वयंम शिक्षण प्रयोग या संस्थेच्या सहकार्याने  ३५० किराणा साहित्याचे कीट  गरीब व गरजूंना  देणेसाठी चे नियोजन करण्यात आले होते, याठिकाणी २५ लाभार्थीना प्राथमिक स्वरूपामध्ये  आमदार  कैलास दादा पाटील व  नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैया राजेनीबाळकर  याचे हस्ते वाटप करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती नगरसेवक राजाभाऊ पवार,आँड्व्होकेट विशाल साखरे,उपशहर प्रमुख बंडू आदरकर,युवानेते पंकज पाटील,गटनेते नगर पालिका सोमनाथ  गुरव,युवानेते चेतन वाटवडे  होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक  काकासाहेब आडसुळे यांनी केले तर आभार आकाश लष्करे यांनी मानले. याठिकाणी संस्था प्रतिनिधी म्हणून प्रशांत डांगे,तबसुम मोमीन, गोदावर क्षीरसागर,दीपाली थोड्सरे, अंजली वाकुरे,सीमा सय्यद, शाहेदा मुजावर हजर  व ग्रामस्थ महिला पुरूष लाभार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

 
Top