तुळजापूर / प्रतिनिधी-

 नगर परिषद कर्मचारी संघटनेची बैठक संघटनेचे अध्यक्षपदी वैभव अंधारे यांची निवड सोमवार झालेल्या  बैठकीत करण्यात आली. 

 माजी अध्यक्ष  श्री दत्ता साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत  जिल्हाध्यक्ष बदलणे, सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करणे  सदर विषयावर सविस्तर चर्चा होऊन वरील तिन्ही विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले तसेच तुळजापूर नगरपरिषद प्रशासकीय संवर्ग कर्मचारी संघटना अध्यक्षपदी वैभव अंधारे यांची निवड झाल्यामुळे सदर बैठकीमध्ये त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच  कार्यकारणी व रिक्त पदावरील निवड झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार संघटनेच्या अध्यक्षांनी केला. 

या कार्यकारणी मध्ये संघटनेच्या सचिव पदी ज्ञानेश्वर टिंगरे, सहसचिवपदी  नागेश श्रीराम काळे,कोषाध्यक्षपदी शिवरत्न अतकरे, सल्लागार महादेव सोनार व   प्रशांत चव्हाण, संघटक जमुना श्याम वाळा व विमल चिमाजी साळुंखे, प्रसिद्धीप्रमुख सज्जन गायकवाड,  मार्गदर्शक अशोक सनगले, अभंग गायकवाड,संस्कृतीक विभाग प्रमोद भोजने, कार्यकारणी सदस्य पदी नंदू क्षिरसागर, गुणवंत कदम,राहुल मिटकरी,अंबादास माळवदकर,दत्ता कसबे,शोभा कांबळे रमेश साळुंखे,महादु शिंदे आदी उपस्थितीत होते.

 
Top