लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेचे रोखपाल ज्ञानेश्वर बिराजदार यांची दुसऱ्या शाखेत बदली झाल्याने त्यांचा शिवबसाव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

यावेळी ज्ञानेश्वर बिराजदार यांचा संस्थेचे अध्यक्ष महादेव कारभारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाखेचे व्यवस्थापक एम.बी.सय्यद.महेश पाटील, बाबुराव वाघमारे, सागर धरणे, बसवराज कारभारी, राजु पंचभाई, उपस्थित होते.


 
Top