मुरूम / प्रतिनिधी

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा सेवा संघ आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक अभिवादन सोहळा रविवारी (ता.६) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी योगेश जगताप, माजी प्राचार्य दत्ता इंगळे, भीमराव फुगटे, प्रा. डॉ.दत्तात्रय मुरुमकर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक प्रतिमेस पुष्पहार घालून महापुरुषांच्या घोषणा देत त्रिवार अभिवादन करण्यात आले. 

\याप्रसंगी बोलताना आस्मानी सुलतानी संकटांना पेलून बारा आघाड्यावर लढत बलाढ्य अशा मोगलाईला मातीमोल करून सर्वसामान्य पिचलेल्या उपेक्षितांना सोबत घेऊन भूमिपुत्रांच्या हक्काचे साम्राज्य उभे करुन धर्माच्या नावावर अनेकांना भीती घालणाऱ्या, वैदिक व्यवस्थेला धक्का देऊन सकल मराठीजणांचे स्वराज्य उभे करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या देखरेखीखाली व शिवपुत्र शंभूराजांच्या नियोजनबद्धतेने संपन्न झाला, तो अशा राजाचा राज्याभिषेक आजही शहरात उत्साहात साजरा केला जातो, हे गौरवास्पद असल्याचे मुंबई विद्यापीठाचे प्रा.डॉ.दत्तात्रय मुरूमकर  यांनी विचार व्यक्त केले. दत्ता इंगळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. 

प्रास्ताविक किरण गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन व आभार मोहन जाधव यांनी मानले. यावेळी विठ्ठल पाटील, संजय सावंत, गणेश जाधव, विष्णु चव्हाण, आकाश शिंदे, किशोर गायकवाड, आनंद कांबळे, सचिन शिंदे, भालचंद्र शिंदे, विशाल व्हणाळे, महेश शिंदे, प्रल्हाद माने, गणेश शिंदे, संभाजी शिंदे, अक्षय शिंदे, आबा शिंदे, वैभव शिंदे, विकी शिंदे, सागर धुमुरे, बंडू ब्याळे, विशाल जगदाळे, रतन मुडे, प्रशांत शिंदे, अमर भालेराव, दिनेश माने, प्रवीण चौधरी आदींनी पुढाकार घेऊन हा सोहळा यशस्वी केला.

 
Top