लोहारा/प्रतिनिधी

परिवहन महामंडळाची बस व दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना माकणी - लोहारा मार्गवरील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पुलावर दि.15 जुन 2021 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, उमरगा आगाराची नागूर - उमरगा बस उमरग्याकडे परतत होती. विकास गोरे (रा. आशिव ता.औसा), दौलत चव्हाण (रा. लोहटा, ता. औसा), दादासाहेब गडकर (रा. माकणी) हे दुचाकीने माकणीहून लोहाऱ्याला जात होते. माकणीपासून एक किलमीटर अंतरावरील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पुलावर बस व दुचाकीची धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील विकास गोरे, दौलत चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या गडकरला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनास्थळी लोहारा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ए.एन.वाठोरे, एस.बी. साखरे, एल.आर.भोपळे, ए.व्ही.राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली.

 
Top