उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा परिषदमध्ये दिव्यांग व्यक्ती व वाहनचालकांच्या विश्रामासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षांचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिताताई कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहन चालक असून त्यांना रिकाम्या वेळेत बसता यावे. तसेच जिल्हा परिषदेमध्ये अभ्यागत स्वरूपात कामासाठी येणाऱ्या दिव्यांग नागरिकांना आवश्यकतेप्रमाणे थांबता यावे, यासाठी विश्राम कक्षाची संकल्पना पुढे आली. जिल्हा परिषदेमध्ये दोन वेगवेगळ्या कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे.

या कक्षासमोर बगीचा तयार करण्यात आला आहे. या कक्षांचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती कांबळे यांनी उद्घाटनप्रसंगी केले.वाहनचालक व दिव्यांग कर्मचाऱ्यांनी याबद्दल जिल्हा परिषदेचे आभार व्यक्त केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड,सभापती श्रीमती टेकाळे, कार्यकारी अभियंता नितीन भोसले,उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, नितीन दाताळ, डॉ. हनुमंत वडगावे आदी उपस्थित होते.


 
Top