कळंब / प्रतिनिधी-

 येथील आडत बाजारातील एका पन्नास वर्षीय वॉचमन चा शुक्रवारी मध्यरात्री खून झाला होता. या प्रकरणात गोळीबार च झाला असल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली.

 कळंब येथील मार्केट यार्ड भागात अजय साहेबराव जाधव यांच्या अडत यवसाय आहे. आपल्या आडत दुकानाच्या वरच्या मजल्यावर जाधव कुटुंबीय वास्तव करते. याठिकाणी मागच्या अनेक वर्षा पासून दिकसल भागातील फरिदनगर येथील रहवासी मच्छिंद्र छगन माने हे वॉचमन मानून काम पाहत होते. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे जाधव यांच्या अडतीवर वॉचमन मानून नाईट दुईटी बजावत असलेल्या पन्नास वर्षीय मच्छिंद्र मने यांची छातीवर असलेला व्रण नेमका कशाचा आहे, हे लक्षात येत नसल्यामुळे मृतदेह शविच्छेदनासाठी अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठवला होता. त्या ठिकाणी मयात मने यांच्या छातीत एक बुलेट आढळून आल्याचे सादर हत्या ही गोळीबार करून केल्याचे सादर झाले होते. दरम्यान, याप्रकरणी मयातचा मुलगा विशाल माने यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिसात आज्ञात यक्तिविरुध भादवी 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा पुढील तपास सापोनी अशोक पवार हे करत होते.

चोवीस तासात आवळल्या मुसक्या....

घटनास्थळला पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी भेट दिली होती. कळंब पोलिस सह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी विविध अंगाने या प्रकरणाचा तपास करत होते. शेवटी गुन्हे शाखेचे पोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊ नि  भुजबळ, पौका काझी, सय्यद,अमोल चव्हाण, जाधवर, ढिगारे, मल्लेपल्ले, सर्जे, सावंत यांच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यापसून 24 तासाच्या आत शाम उर्फ बायलार राजाभाऊ पवार (वय 23 , रा. केज , जि. बीड), गणेश सुब्रव पवार ( वय 19, रा. कल्पना नगर,  पारधी पिढी, कळंब) या दोघांना मोठ्या शिथापिने पकडले.

 
Top