परंडा / प्रतिनिधी : - 

तालुक्यातील टायगर ग्रुपतर्फे जिल्हा परिषद भोंजा हवेली येथील शाळेत सोमवार दि.१४ रोजी पहिल्या दिवशीच स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण करण्यात आले.

 भोंजा हवेली येथील टायगर ग्रुपतर्फे सामाजिक बांधीलकीतून शाळेत स्वच्छता करण्यात आली. तसेच शाळेच्या परिसरात करंजी, सप्तपर्णी व शोभेच्या झाडांचे रोपण करण्यात आले.

    यावेळी प्रशालेचे अध्यक्ष पांडुरंग मोरे, उपाध्यक्ष रामदास जाधव,शरद कोळी, दिप्तेश कांबिलकर,नेताजी मोरे,रविराज सरवदे,अमोल मोरे ,सुजित पोळके, कुमार जाधव,सचिन जाधव,राहुल जाधव,भरत गोरे,गणेशदादा नेटके,श्रीराम भांदुर्गे ,मुख्याध्यापक एच.एस.पाटील व ए.यु.शेळवणे व स्वयंपाकी श्रीमती सरवदे डी. बी.उपस्थित होते.


 
Top