उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उस्मानाबाद तालुका अध्यक्षपदी शाम शिवाजीराव घोगरे व उस्मानाबाद तालुका कार्याध्यक्षपदी नानासाहेब गोरोबा जमदाडे  यांची निवड करण्यात आली. शाम घोगरे  यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते आणि  ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, संजय निंबाळकर, संजय दुधगावकर, संपत आबा डोके, यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, नंदकुमार गवारे,जिल्हा उपाध्यक्ष कादर खान, वाजेद पठाण, , उस्मानाबाद शहराध्यक्ष आयाज शेख, शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, माजी चेअरमन उस्मानाबाद दूध संघ नवनाथ राऊत , शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल, आळणी सरपंच प्रमोद वीर, नगरसेवक बाबा मुजावर, अमोल सुरवसे,महेश नलावडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


 
Top