कळंब  / प्रतिनिधी-

 शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित लोंढे यांना मारहाण केल्याप्रकरणी एका वर शासकीय कामात अडथळा सह कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे 

या बाबत सविस्तर वृत्त असे कि शहरातील एकाने डॉ.लोंढे यांना मारहाण केलीय या भ्याड हल्ल्याचा शहरात सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. कळंब शहरातील शासकीय लसीकरण केंद्र हे विजया नर्सिंग होम म्हणजेच डॉ. लोंढे यांच्या रुग्णालयात सुरू आहे. त्यामुळे या रुग्णालयात लस घेण्यासाठी मोठी गर्दी होते. म्हणून रुग्णालयाच्या समोरील भागात गाड्या लावण्यासाठी जागा अपुरी पडते. लोंढे यांच्या रुग्णालयासमोर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांचे निवासस्थान आहे. कल्पना नरहिरे यांचा पुतण्या बालाजी नरहिरे याने आमच्या घरासमोर गाड्या का लावतात म्हणून रुग्णालयाच्या बाहेर शिवीगाळ करायला सुरुवात केली. काय गोंधळ सुरू आहे, हे पाहण्यासाठी डॉ. अभिजित लोंढे हे बाहेर आले असता त्यांनी आम्हाला का शिवीगाळ करत आहे, असा जाब नरहिरे यांना विचारला. जाब विचारताच बालाजी नरहिरे याने माझी कॉलर धरून मारहाण करायला सुरुवात केली, अशी माहिती स्वतः डॉ. अभिजित लोंढे पञकार शी बोलताना दिली.

या मारहाणीनंतर मोठयप्रमानात निषेध व्यक्त केला जात आहे. डॉ.अभिजित लोंढे हे इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांचे सुपुत्र आहेत. असोसिएशनच्यावतीने या मारहाणीचा निषेध व्यक्त केला जात आहे. याबाबत कळंब पोलिस ठाण्यात बालाजी नरहिरे वय 42 याच्या वर कलम ,323, 353, भादवी 504, आपत्ती व्यवस्थापन असा गुन्हा नोंद झाला असुन पुठील तपास सपोनी आशोक पवार हे करीत आहेत. 


 
Top