काटी / प्रतिनिधी-

तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला विस्तार अधिकारी मल्हारी माने यांनी भेट देऊन पाहणी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने तूर्तास नवीन वर्षाची सुरुवात ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे मागील वर्षीही विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाचा प्रत्यक्ष आनंद घेता आला नव्हता आणि यंदाही कोरोनाचा विद्यार्थ्यांना प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी यंदाही वर्गशिक्षकांची तोंडओळख ऑनलाइनच होणार असून विद्यार्थ्यांना अभ्यासाला सुरुवातही ऑनलाइनच करावी लागणार आहे. विस्तार अधिकारी मल्हारी माने यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी भेट देऊन कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर शाळेचे मुख्याध्यापक देशभूषण दुरुगकर यांच्यासह शाळेतील सहशिक्षिकांनी केलेली शाळापूर्व तयारी, शाळा परिसर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, मुला-मुलींची शौचालय, या विषयी माहिती घेऊन मार्गदर्शन केले. या वेळी सहशिक्षक इर्शाद शेख, पोपट सुरवसे, वासंती गायकवाड उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाचा प्रत्यक्ष आनंद घेता आला नव्हता आणि यंदाही कोरोनाचा विद्यार्थ्यांना प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी यंदाही वर्गशिक्षकांची तोंडओळख ऑनलाइनच होणार असून विद्यार्थ्यांना अभ्यासाला सुरुवातही ऑनलाइनच करावी लागणार आहे.  

 
Top