उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 ढोकी व शिराढोण येथील गुन्ह्यातील फरार आरोपींना कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अटक केली. पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्या आदेशावरून मंगळवार रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ढोकीतील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मेघराज साळुंके (रा. निवळी, ता. लातूर) व शिराढोण येथील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी राजा देविदास भोसले (रा. तीर्थ, खु., ता. तुळजापूर) यांना ताब्यात घेवून संबंधीत ठाण्याच्या ताब्यात दिले.


 
Top