कळंब / प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते माजी एसटी महामंडळ अध्यक्ष जीवनराव गोरे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागचे जिल्हाध्यक्ष खलील पठाण यांच्या हस्ते कळंब  तालुका अल्पसंख्यांक विभाग  अध्यक्षपदी श्री अतिक एजाज पठाण, कळंब शहराध्यक्षपदी सर्फराज अलीम मोमिन, कळंब  तालुका उपाध्यक्ष पदी सादेक  दस्तगीर  शेख यांची निवड राष्ट्रवादी भवन येथे करण्यात आली. तसेच कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा कु. सक्षणा सलगर, युवक जिल्हाध्यक्ष श्री आदित्य गोरे, जिल्हा उपाध्यक्ष कादर खान, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी ,सलमान खान पठाण, अन्वर पठाण, अजीम शेख, अमजद पठाण,प्रवीण शिंदे ,मुकेश जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 

 
Top