उस्मानाबाद / प्रतिनिधी-

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूरच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील, वरिष्ठ विभागातील हिंदी विषयाचे प्रा.डाॅ.डी.वाय इंगळे व इंग्रजी विभागातील प्रा.डाॅ.ए.बी.इंदलकर आणि प्रा.सर्जेराव दोलतोडे हे ञिमुर्ती गुरू प्रदिर्घ सेवेनंतर शासनाच्या नियमाने आपल्या पदावरून ३१मे रोजी,सेवानिवृत्त झाल्यामुळे आज दि.१जुन रोजी, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते या ञिमुर्ती प्रोफेसरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

प्रारंभी संस्थेचे संस्थापक प.पु.डाॅ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे पुतळ्यास सेवानिवृत्त होणा—या प्रोफेसरांनी पुष्पहार अर्पण करून पुजन केले.

सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने साधेपणाने प्राचार्य यांचे केबीनमध्ये सत्कार करण्यात आला.यावेळी उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी, प्रा.डी.एम.शिंदे,प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,प्रा.डाॅ.महाडिक, प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर,प्रा.राजा जगताप,प्रा.माधव उगीले,प्रा.डाॅ.विद्या देशमुख,प्रा.सौ.सरवदे,प्रा.मोहन राठोड,श्री.धनावडे आदी उपस्थित होते.


 
Top