उस्मानाबाद/ प्रतिनिधी

आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी जिल्हयात 21 जून ते 1 जुलै या कालावधीत कृषी संजिवनी मोहिम राबविण्यात येणार आहे.या कालवधीत प्रत्येक दिवशी महत्वाच्या मोहिेमांवर विशेष भर देऊन प्रचार आणि प्रसिध्दी करण्यात येणार आहे. 21 जून रोजी कृषी संजिवनी सप्ताहाचा जिल्हा स्तरावर ऑनलाईन वेबीनारव्दारे शुभारंभ करण्यात आलेला आहे.प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष बी.बी.एफ व्दारे पेरणी आणि प्रात्यक्षिके घेण्यात आली.

या मोहिमे दरम्यान 22 जूनला बीज प्रक्रिया,23 जूनला जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर,24 जूनला कापुस-एक गाव एक वाण,कडधान्य क्षेत्रात आंतरपी तंत्रज्ञान,25 जूनला विकेल ते पिकेल,28 जून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडव तंत्रज्ञान प्रसार, 29 जून तालुक्यातील दोन पिकांत उत्पादकता वाढीसाठी रीसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग,30 जून जिल्हयातील महत्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना या कार्यक्रमाचे आयोजन करुन 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात येणार आहे.

या मोहिमे दरम्यान कृषी विभागाच्या महत्वाच्या योजनांची माहिती ब्लॉग स्पॉटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभाग मिळून या कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करणार आहे.या मोहिमेत जिल्हयातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे.

 
Top