तुळजापूर / प्रतिनिधी-
पोलिसांनी कोरोना निर्मुलनासाठी संचारबंदी काळात शुक्रवार दि. २० रोजी नाकेबंदी कारवाई दरम्यान विनामास्क , सोशल डिंटन्स न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आदी प्रकरणी ७९ जणांवर कारवाई करुन १९४०० रुपये दंड वसुल केला.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यु पुकारलेला असतानाही विनाकारण दुचाकीवर विनामास्क मोकाट फिरणा-यां पुरुष व महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नाकाबंदी कर्यवाही दरम्यान विना मास ५ केसेस २५०० रू दंड , सोशल डिस्टंस ५३ केसेस १०६०० रू दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १ केसेस १०० रू. दंड, एमऐव्हीसीटी २० केसेस ५३०० रू दंड केला एकुण केसेस ७९ केसेस करुन १९४०० रुपये दंड वसुल केला.
या कारवाई दरम्यान ज्यांच्या जवळ ओळखपञ आहे त्यांना सोडुन देण्यात आले. यावेळी शेतकरी वर्गाचे ट्रँक्टर, खत बि-बियाणांचा, औषधांच्या गाड्या सोडुन दिल्या. ही कारवाई पोलिस निरक्षक मनोज राठोड यांच्या मार्गदर्शन खाली ऐपीआय चव्हाण ऐपीआय रोटे ऐपीआय दांडे महिला ऐपीआय पवार यांच्या सहहवालदार सावरे पो काँ माने भोपळे वानखेडे सह पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.