तुळजापूर / प्रतिनिधी-
येथील पुजारी बांधवांना लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देवुन पुजारी व्यवसाय ठप्प असल्यामुळे प्रत्येकी दहा हजार रुपये अनुदान देण्याची मागणी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देवुन केली आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, येथील पुजारी वर्गासाठी व त्यांच्याशी निगडीत कुटुंबासाठी लसीकरणाकरीता 20,000 स्वतंत्र डोस उपलब्ध करुन देण्यात यावेत, कोरानो संक्रमणामुळे तुळजापूर येथील पुजारी वर्ग व त्यांच्याशी निगडीत कुटुंबाची होणारी आर्थिक कोंडी सोडविण्यासाठी प्रत्येक कुटुंबासाठी प्रत्येकी 10,000 इतके अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात यावी. सबब वरील नियोजण हे श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान मार्फत केल्यास पुजारी वर्गासाठी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परस्थितीत सामोरे जाणे सुलभ होणार आहे. असे निवेदननात म्हटलं आहे.