परंडा / प्रतिनिधी : -

जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी लसीकरण केंद्रावर होणारा गोंधळ टाळण्यासाठी विशेष पथकाच्या नियुक्त्या केल्या आहेत त्या अनुषंगाने तालुक्यातील शेळगाव आरोग्य केंद्रावर विशेष पथक म्हणून गट शिक्षणाधिकारी पं.स परंडा श्रीम.अनिता जगदाळे यांनी उपस्थिती लावली.

जिल्ह्यास कोवीड-१९प्रतिबंधाच्या दृष्टीने मिळणाऱ्या लसीचे प्रमाण हे सद्यस्थितीत लोकसंख्येच्या तुलनेत कमी असल्याने व लोकांना आता लसीचे महत्व समजल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी,गोंधळ होत आहे.ही गर्दी गोंधळ टाळण्याचे दृष्टीकोनातून व‌ लसीकरणासाठी येणा-या नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य व्हावे या करिता आज पासून होणा-या लसीकरणासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रास एक संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.

सामाजिक आंतर ठेवून रांगेत उभे राहणे, त्यांना त्यांचा नंबर म्हणून चिठ्ठी देणे,गर्दी गोंधळ होऊ न देणे याचे काटेकोरपणे पालन करत शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरळीत पार पडले. ‌

यावेळी गट शिक्षणाधिकारी पं.स.परंडा श्रीम.अनिता जगदाळे,सहाय्यक शिक्षक वैजीनाथ सावंत, वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य पांडे, डॉ.साबेर सय्यद, आरोग्य सहाय्यिका शांता गवले,एमपीडब्ल्यू कृष्णा जाधव, भालचंद्र बोंडगे, आरोग्य सेविका आशा काळे,स्वाती इळे,लंका शेवाळे, परिचर भाऊसाहेब खेडकर, रमेश सरकटे आदिनी चोख कर्तव्य बजावत कामकाज पाहिले.

 
Top