परंडा / प्रतिनिधी : -

 परंडा युवा सोनार संघटना कार्यकारणी जाहीर झाली असून परंडा तालुका अध्यपदी सुरेश बागडे यांची  बिन विरोध निवड  करण्यात आली आहे.

 महाराष्ट्र राज्य युवा सोनार संघटनाचे संस्थापक अध्यक्ष आदित्य दहिवाळ म.उपाध्यक्ष शुभम दहिवाळ, कार्याध्यक्ष अविनाश उडानशिव,महाराष्ट्र राज्य सचिव अजय जढे ,म.राज्य सचिव रोहित महादने, म.राज्य सचिव हेमंत सराफ ,प्रदेश विस्तारप्रमुख नितीनजी आहिरराव,महिला प्रदेशध्यक्षा रिना सोनार ,महिला प्रदेश उपाध्यक्ष ज्योती दहिवाडकर महिला प्रदेश सचिव शितल विखनकर यांचे नेतृत्वाखाली उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष कृष्णा डहाळे,कार्याध्यक्ष आकाश पोतदार उपाध्यक्ष संभाजी पोतदार, सचिव विनोद चिंतामणी, सहसचिव अनिल पंडित यांचे मार्गदर्शनाखाली परंडा युवा सोनार संघटना अध्यक्षपदी सर्वानुमते सुरेश श्रीहरी बागडे यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी मनोज शहाणे, सचिव मनोज वेदपाठक कार्याध्यक्ष सुधिर कल्याणकर तर सहसचिव विष्णू मुळीक यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

यावेळी परंडा सराफ संघटनेचे मनोज चिंतामणी, अमोल शहाणे, मिलींद चिंतामणी ,भगवान शहाणे,संतोष नस्टे, संतोष कदम,माने अरूपकुमार, प्रशांत डहाळे,अकतर,बबलु आदी उपस्थित होते.

 
Top