उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथे खरीप हंगामाच्या अनुषंगाने सोयाबीन पिकाची उगवण शक्ती आणि बीजप्रक्रिया याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यावेळी शेतकरी शारीरिक अंतर राखून उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी सोयाबीन पीक, शेतीशाळा, माती परीक्षण, खत व्यवस्थापन, सोयाबीन पिकासाठी रुंद सरी वरंबा पेरणी पद्धतीचे महत्त्व सांगितले. तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग, गांडूळ युनिट, नाडेप युनिट, शेततळ्याच्या क्षेत्रवाढी मार्गदर्शन करण्यात आले. 

खरीप पेरणीसाठी आवश्यक निविष्ठा या गावातील कार्यक्षम आणि इच्छुक गटामार्फत एकत्रित खरेदी करून गावामध्ये रास्त भावामध्ये विक्री कराव्यात. यामुळे वाहतूक खर्च व वाहतुकीमधील इतर अडचणी आणि करोना विषाणूंचा वाढता फैलाव आणि धोकाही कमी होण्यास मदत होईल. यावेळी विश्वंभर कोरे यांच्या शेतावर कोरडवाहू क्षेत्र विकास मुरघास युनिटला भेट दिली. यावेळी प्रगतशील शेतकरी जिनेन्द्र पाटील, अभिजित पाटील, अविनाश पाटील, बाबुराव चव्हाण, संतोष पवार, राम बनसोडे, राहुल कोरे, महिला शेतकरी कमलबाई चव्हाण, लक्ष्मीबाई राठोड उपस्थित होते.  कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

 
Top