उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

भारतीय जनता पार्टी उस्मानाबादच्या वतीने  प्रतिष्ठान भवन, भाजपा कार्यालय उस्मानाबाद येथे पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती साजरी करण्यात आली.

जनतेच्या कल्याणासाठी अविरत झटणा-या प्रजाहित दक्ष राज्यकर्त्या कुशल प्रशासक, दानशुर पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भाजपा बुध्दीजीवी प्रकोष्ठ दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारीनी सदस्य अड. खंडेराव चौरे,जिल्हा सरचिटणीस अड.नितीन भोसले, भाजयुमोर्चा जिल्हाध्यक्ष   राजसिंहा राजेनिंबाळकर,  माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, शहर अध्यक्ष राहुल काकडे, नगर सेवक प्रवीण पाठक, संदीप इंगळे, नरेन वाघमारे, अंबुरे ताई, देवकन्या गाढे, जोत्सना लोमटे, तसेच भाजपाचे पदाधीकारी व कार्येकर्ते  मोठया संख्येने उपस्थीत होते.


 
Top