उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

केंद्र सरकारने ४५ वर्षे वयोगटावरिल सर्व नागरीकांना लसीकरण करण्यासाठी जलद व मोठ्या प्रमाणात लस पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देशाचे पंतप्रधान  नरेंद्र भाई मोदी व केंद्रीय आरोग्य मंत्री  डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असताना माझ्या उस्मानाबाद (महाराष्ट्र) लोकसभा मतदारसंघातील उस्मानाबाद जिल्ह्यासह लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय सह, ग्रामिण रुग्णालय, खाजगी रुग्णालयात ही सद्यपरिस्थितीत बेड अपुरे पडत आहे. केंद्र व राज्यसरकारच्या मार्गदर्शक नियमानुसार सध्या ४५ वर्षे वयोगटावरिल सर्व नागरीकांना लसीकरण करण्यासाठी पहिला व दुसरा लसीकरण डोस उस्मानाबाद जिल्ह्यात ९,३१,७७४ देणं बाकी आहे. औसा व निलंगा तालुक्यात २,०६,८०२ देणं बाकी, तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात ०१,०१,००२ देणं बाकी असे माझ्या लोकसभा मतदारसंघात १२,३९,५७८ लस देणं आवश्यक आहे. परंतु आत्ता पर्यंत माझ्या लोकसभा मतदारसंघात २,२५,७१६ व्हॅकसीन लस उपलब्ध झाली आहे. आणखीन १० लक्ष १३ हजार ८६२ एवढ्या लसीची आवश्यक गरज आहे. 

महाराष्ट्र शासन केंद्र सरकारकडे ४५ वर्षांवरील पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोस देण्यासाठी लस उपलब्ध करून देण्यासंदर्भात वारंवार मागणी करत आहे. परंतु केंद्र सरकार महाराष्ट्र शासनाच्या या मागणी कडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. केंद्र सरकारने ४५ वर्षे वयोगटावरिल सर्व नागरीकांना लसीकरण करण्यासाठी जलद व मोठ्या प्रमाणात लस पुरवठा उपलब्ध करण्यासंदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्राद्वारे देशाचे पंतप्रधान  नरेंद्र भाई मोदी व केंद्रीय आरोग्य मंत्री  डॉ.हर्षवर्धन साहेब यांच्या कडे विनंती मागणी केली आहे.

नागरिकांनी शासनाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे व सोशल डिस्टंसींगचे पालन करण्याचे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे.

 
Top