कळंब / प्रतिनिधी- 

तालुक्यातील मलकापूर /संजितपुर ग्रामपंचायतच्या वतीने आशा कार्यकर्त्यांना व अंगणवाडी ताईंना,शिक्षक,कर्मचारी यांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शाखा अध्यक्ष संतोष लोमटे यांच्या हस्ते याचे वाटप करण्यात आले.

यामध्ये फेस शील्ड,N 95 मास्क,हॅन्ड ग्लोज,व तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या पल्स मीटर,थर्मामीटर,सानिटायझर किटचे वाटप करण्यात आले. तसेच मलकापूर /संजितपुर गावांमध्ये नागरिकांना मास्क,सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले, यावेळी राष्ट्रवादीच्या गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच रुक्मिणी अगतराव घोळवे,उपसरपंच सुधीर पायाळे,ग्रामसेवक दिपक वेदपाठक,दैवशाला काकडे,अगतराव घोळवे,तात्या काकडे ,पाशाभाई सय्यद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सचिव समाधान बाराते ,सुर्यकांत लोमटे,सुधिर लोमटे,संजय लोमटे,महादेव वनवे,राजेंद्र वनवे,तानाजी वनवे ,राहुल वनवे आदी उपस्थित होते.  यावेळी संपूर्ण गावाचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच रुक्मिणी घोळवे यांनी दिली.

 
Top