उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

तालुक्यातील केशेगाव येथे राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्यावतीने शरदचंद्रजी पवारसाहेब ग्रामीण केअर आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात येणार असून याचे उद्घाटन दि.१४ मे रोजी करण्यात येणार आहे.

केशेगाव येथे कोरोना रुग्णांची सोय व्हावी यासाठी ५० खाटांचे आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

 याचे उद्घाटन नायब तहसिलदार मुस्तफा खोंदे, युवा नेते अभिजीत पाटील, सरपंच अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी मंडळ अधिकारी व्ही.व्ही. काळे, जी.के.तलाठी कोळी, ग्रामसेवक करपे आदीसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिसरातील कोरोना बधित रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण नटवरे यांनी केले आहे.

 
Top