वाशी / प्रतिनिधी- 

सध्या रासायनिक खताचे दर आकाशाला भिडले असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे.सध्या शेतीत माशागतीचे कामे चालू आहेत.थोड्याच दिवसात पेरणीला सुरुवात होणार आहे.पेरणी पूर्वीच खताचे भाव आकाशाला भिडले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक नाडी कोलमडणार आहे.कृपया भारत सरकार ने रासायनिक खताचे दर कमी करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांला विशेषतः उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे  .जर रासायनिक खताचे दर कमी न झाल्यास युवक काँग्रेस च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .असे निवेदन     तहसीलदार वाशी यांच्या मार्फत पंतप्रधान यांना  देण्यात आले. 

यावेळी युवक कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस अवधुत क्षिरसागर ,महिला जिल्हा सरचिटणीस  स्नेहल स्वामी,जिल्हा सरचिटणीस शामराव भोसले,वाशी तालुका अध्यक्ष राजेश शिंदे,युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अमर तागडे,बाळासाहेब गपाट ग्रा.प.सदस्य इंदापूर , युवक काँग्रेस माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब पोरे , ओबीसी सेल तालुका अध्यक्ष अमोल बोडके, हरी गपाट व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top