उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

चोराखळी साखर कारखान्या समोरील राष्ट्रीय महामार्ग 52 वरील पुलावर एका अज्ञात इसमाचा मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला आहे, या मृत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन येरमाळा पोलीस स्टेशनने केले आहे.

अज्ञात इसम (वय अंदाजे 42 वर्षे) 14 मे 2021 रोजी मोटरसायकल क्र.MH-23/M-5196 पुलावरील डिव्हायडरच्या कठड्याला धडकून गंभीर जखमी होवून मृत झालेला आहे. इसमाचे नाव, गाव, माहित नाही. पोलिसांनी गाडी नंबरवरुन नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही अद्याप पुढे आले नाही. याबाबत येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. मयत व्यक्तीची माहिती असणाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन येरमाळा येथे माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 
Top