चोराखळीच्या नवले घराण्यातील  महिना भरातील ६ वा. मृत्यू 


उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्ह्यातील चोराखळी येथील रहिवाशी व पुणे स्थित भारतीय रेल्वे मधील इंजिनिअर  श्री मदन किसनराव नवले यांचे चिरंजीव  श्री प्रवीण  मदन नवले (वय ३४) यांचे पुणे इथे आज  दि. ११-०५-२०२१ रोजी पहाटे १.०० वाजता कोरोना वरील उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.  

श्री प्रवीण  मदन नवले हे कुवैत येथे हनिवेल ग्लोबल मध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. कुवैत मधून ते लॉकडाऊन -१ मध्ये भारतात पुणे इथे स्वगृही आले होते. मागील २० दिवसापूर्वी त्यान्ला ताप येत असल्या मुले त्यांनी कोरोना टेस्ट दिली. मात्र  पॉसिटीव्ह रिपोर्ट ४ दिवसानंतर मिळाला.  तातडीने त्यांला खाजगी रुग्णालयात ऍडमिट केले. गेले ६-७ दिवस ते व्हेंटिलेटर वर होते तरीही ते उपचाराला प्रतिसाद देत होते. परंतु काल  अचानक त्यांची औक्षिजन लेव्हल खालावली व आज दि. ११-०५-२०२१ रोजी पहाटे १.०० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे वडील मदन नवले, आई, पत्नी, छोटी मुलगी, बहीण, मेहुणे, चुलते असा मोठा परिवार आहे. 

यापूर्वी येथील चोराखळी च्या नवले घराण्यातील  बी. डी.ओ . तुकाराम काशिनाथ नवले, प्रोफेसर डॉ संजय माणिकराव नवले, मुख्याध्यापक माणिकराव नवले, सौ मंदाकिनी माणिकराव नवले व पुणे येथील होंनीवेल ऑटोमोशन लिमिटेड चे  बिसिनेस हेड  सुनील माणिकराव नवले हे नवले कुटुंबियातील पाच सदस्य कोरोना मुळे उपचारा दरम्यान गेले. अवघे ३४ वर्ष वय असलेले  प्रवीण  मदन नवले हि कोरोना मुळे निवर्तले असल्यामुळे सर्वत्र दुःखाचे सावट पसरले आहे. 

 
Top